चौथा लॉकडाऊन संपायच्या आत 5.0 च्या लॉकडाऊनचे संकेत !

0
24

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. पण अजूनही साथ आटोक्यात आलेली नाही. उलट वाढतेच आहे. त्यामुळे चौथा लॉकडाऊन संपायच्या आधीच पाचवा लॉकडाऊन अटळ असल्याचे संकेत केंद्राने दिले आहेत. दरम्यान, कोरोनाव्हायरसमुळं  ठप्प झालेले व्यवहार चौथ्या लॉकडाऊनमध्ये थोडे थोडे खुले व्हायला सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात रेल्वे आणि विमान सेवा सुरू झाली आहे. पण तरीही COVID-19 चा प्रादुर्भाव असलेले रेड झोन पूर्ण बंद आहेत. महाराष्ट्रात तर या साथीने कहर केला आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात घोषित केलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपासून संपत आहे.  मात्र देशातील कोरोनाची संख्या वाढतच असल्याने  चौथा लॉकडाऊन संपायच्या आतच लॉकडाऊन वाढवण्याची चर्चा सुरू आहे. पण हा पाचवा लॉकडॉऊन स्वयंस्फूर्तीने असेल. याचे निर्बंध आणि नियम ठरवण्याचे अधिकार राज्यांना असतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यतः कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या 11 शहरांपुरता तो मर्यादित असू शकतो. सध्याच्या परिस्थितीवरून काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो, तर इतर शहरात हा कालावधी आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.

देशभरात सापडलेल्या एकूण कोरोना प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणं फक्त या 11 शहरांमध्ये आहेत. त्यामुळे ही शहरं वगळता अन्यत्र व्यवहार सुरळीत व्हायला संधी देण्याची शक्यता आहे. या 11 मधली 3 शहरं महाराष्ट्रातली आहेत.

कोणती आहेत 11 शहरं

दिल्ली

मुंबई

बंगळुरू

चेन्नई

अहमदाबाद

कोलकाता

पुणे

ठाणे

जयपूर

सुरत

इंदोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here