नवी दिल्ली – राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ हे वक्तव्य मी राजकीय प्रचाराच्या ओघात केले आहे. मात्र माझ्या राजकीय विरोधकांनी त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. मी हे वक्तव्य जाणूनबुजून, हेतुपुरस्सर केले असल्याची तक्रार त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मात्र तसे काहीही माझ्या मनात नाही’ असे स्पष्टीकरण दिले आहे.
चौकीदार चोर आहे हे सर्वोच्च न्यायलयाने देखील म्हणत आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. यावरून ते वादात सापडले होते. भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयासंदर्भात जे काही वक्तव्य केले आहे ते चुकीचे आहे असे 15 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने असे कोणतेही वक्तव्य केले नाही आणि न्यायालयासमोर असे वक्तव्य करण्यासारखा कोणता प्रसंगही नव्हता. कारण त्यावेळी कागदपत्रांच्या स्वीकार आर्हतेवर निर्णय घ्यायचा होता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायलयाने यासंदर्भात राहुल यांना 22 एप्रिल पर्यंत उत्तर देण्यास सांगितले आणि 23 एप्रिलला सुनावणी होईल असेही म्हटले होते. आज या वक्तव्यावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली.