‘चौकीदार चोर हैं’वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस

0

नवी दिल्ली :- ‘चौकीदार चोर है’ हे न्यायालयानंही मान्य केलंय, असं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना ही नोटीस बजावली आहे. ‘येत्या २२ एप्रिलपर्यंत या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्या,’ असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं राहुल यांना नोटीस बजावली. 

राफेल डीलच्या विषयात काही कागदपत्रांचा स्वीकार करण्यासंबंधी निर्णय घ्यायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कुठलीही टिप्पणी करण्याचा प्रश्नच नव्हता असे सर्वोच न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली होती. राफेल डीलमध्ये ‘चौकीदार मोदी चोर हैं’न्यायालयानंही मान्य केल्याचं राहुल गांधी त्यांनी म्हटलं होतं. भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. ‘राहुल हे स्वत:ची मतं सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालत आहेत. त्यामुळं न्यायालयाचा अवमान झाला आहे,’ असं लेखी यांनी याचिकेत नमूद केलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.