धरणगाव : धरणगाव येथील मोठा माळी वाडा येथील रहिवासी धरणगाव नगरीचे माजी प्रभारी नगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक 1 चे विद्यमान नगरसेविका सुरेखा विजय महाजन यांच्या घरी ऐन संक्रात चा दिवशी घरातून 8 तोळे सोने चोरीस गेले होते म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजय महाजन यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी यशस्वीपणे सापळा रचून या घटनेची दाखल घेऊन आरोपी ला शोध मोहीम सुरू केली अवघ्या दोन दिवसात आरोपी ला शोधून त्याला जेरबंद करून त्याची सखोल चौकशी करून त्याचा कडून माहिती काडून घेतली त्या आरोपींनि चोरी कबूल केल्याने पुढील मार्ग मोकळा झाला यामुळे चोरी गेलेले सोन कोर्टात गेल्याने आज रोजी कोर्टाचा आदेशानुसार पो नि जयपाल हिरे यांनी माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका सुरेखा महाजन यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी सुरेखा महाजन यांच्या डोळ्यातआनंद अश्रू आले तसेच विजय महाजन यांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित पो नि जयपाल हिरे, एस एस आय सैय्यद करीम, महिला पोलीस ज्योती चव्हाण, राहुल बोरसे लष्मीकांत शिंपी , रामचंद्र चौधरी , सामाजिक कार्यकर्ते विजय महाजन, यश महाजन, उपस्थित होते.
पोलीस यंत्रणा वरील दृढ विश्वास झाला
आजचा धकाधकीच्या पोलीस यंत्रणा ला नागरिकांच्या भरोसा नाही आहे पोलीसनावर विश्वास बसत नाही परंतु पोलीसयंत्रणा ही कायदेशीर कारवाई करत असतात तपास यंत्रणा ला सहकार्य करणे गरजे असते पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वकआभार.
सुरेखा विजय महाजन
माजी प्रभारी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेविका धरणगाव