Thursday, September 29, 2022

चोरीस गेलेल्या 12 दुचाकीसह तीन आरोपी ताब्यात

- Advertisement -

चोपडा शहर पोलिसांची कारवाई

- Advertisement -

चोपडा :- चोपडा सह तालुक्यातील चोरीस गेलेल्या 12 मोटरसायकली चोपडा शहर पोलिसांनी हस्तगत केल्या असून, तीन आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी दिली.

- Advertisement -

- Advertisement -

दि 5 रोजी संध्याकाळी शहर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सौरभ कुमार अग्रवाल पुढे म्हणाले की,
चोपडा शहर पोलीस स्टेशन नंबर 81 /2019 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरणर पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र सदाशिव सोनवणे हे दि 30 जून रोजी आझाद चौकात गुन्ह्याचा तपास करीत असताना आझाद चौकात तीन व्यक्ती त्यांचे ताब्यातील मोटरसायकलवर ट्रिपल सेट संशयितरित्या जातांना दिसले .त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल थांबवून त्यांना पोलीस उपनिरीक्षक तुरनर यांनी कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातील हिरो एचएफ डीलक्स ही गाडी चोरीची असल्याचे त्यांच्यातील चालक कमलेश उर्फ कमल बुधा डावर (रा. दिवाण्या ता. शेंदवा जिल्हा बडवानी,मध्य प्रदेश) यांनी सांगितले की,सदर गाडी चोरीची आहे. तसेच त्याच्या सोबतच्या दिलीप बारकू जाधव (बारेला), रामेश्वर उर्फ नाना शेवला जाधव (दोन्ही रा. किरमला, ता. वरला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश) यांना दि 30 जून रोजी सदर गुन्ह्यात अटक केली असता त्यांनी पोलीस रिमांड दरम्यान चोरून दिलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण 12 मोटरसायकली काढून दिल्या आहेत सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांचे सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरणर,पो हे का जितेंद्र सोनवणे,पोलीस हवालदार सुनील पाटील, पोलीस नाईक जयदीप राजपूत ,ज्ञानेश्वर जवागे, प्रदीप राजपूत ,योगेश शिंदे, जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे.
गत वर्षी 27 तर ह्या वर्षी 19 दुचाकी अशा एकूण 46 दुचाकी शहर व तालुक्यातुन चोरीस गेलेल्या होत्या यात
काही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्या ओळख पटवून तात्काळ घेऊन जाव्यात असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या