पारोळा – प्रतिनिधी
येथील तालुक्यातील चोरवड येथे ता, 13 रोजी सायंकाळी 5 वाजेदरम्यान अचानक झालेल्या मेघगर्जना सह पावसाने हजेरी लावली. शेतात काम करीत असतांना साहेबराव भिकन पाटील रा. चोरवड यांच्या बैलावर विज पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली.साहेबराव पाटील यांनी मागील वर्षी 75000 हजार रूपये खर्च करून नविन बैलजोड़ी घेतली हया वर्षी हंगाम चांगला आला नाहि त्यामूळे कर्ज बाजारी स्थितित असलेले साहेबराव पाटिल यांचा बैलावर विज पडून तो ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. ऐन पेरणीच्या पूर्व काळात पाटील यांच्यावर हे संकट कोसळल्याने ते चिंताग्रस्त होते.
परिसरातील विद्युत प्रवाह खंडित
विज पडल्याच्या प्रभावाने चोरवड सह भोंडण. शिरसमणी,टिटवी परीसरातील विद्युत प्रवाह खंडित झाला होता रात्रीच विज प्रवाह सुरळीत करणे कामी योगेश पाटील, निलेश पाटील यांनी मेहनत घेतली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post
Next Post