पारोळा :- तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी एका शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
सुनील शिवाजी पाटील (वय ४२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी तसेच यावर्षीही अत्यल्प पावसाने उत्पादन कमी आल्याने व सद्यस्थितीत हाताला काम नसल्याने विकास सोसायटीचे ५५ हजार व हातउसनवारीचे २ लाख रुपये कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. या कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.