चोपड्यात २८ रोजी भारतीय पत्रकार महासंघाची तालुका बैठक

0

लासुर(प्रतिनिधी)-दि.२८ फेब्रुवारी रोजी भारतीय पत्रकार महासंघाची चोपडा तालुका बैठक शासकीय विश्रामगृह येथे चोपडा तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण,राज्यातील पत्रकारांचे अपघात विमा,कोरोना योद्धा सन्मान सोहळा, सभासद नोंदणी आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन पत्रकारांचा महामेळावा घेण्यासंदर्भात विचार विनिमय होणार आहे.तरी सदर बैठक राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत,केंद्रीय उपाध्यक्ष राकेश कोल्हे,केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील,प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी, राजकुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे,जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ, जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष विश्राम तेले,नारायण पाटील,प्रवीण कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.तरी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कोषाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सरचिटणीस किरण देवराज,उपाध्यक्ष परेश पालिवाल, सहचिटणीस जितेंद्र कोळी,विजय रजाळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.