एस टी चा आगळा वेगळा वर्धापन दिन
चोपडा | प्रतिनिधी
येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात प्रवाशी वाहतुकीची जीवन धमनी एस. टी. चा ७१ वा वर्धापन दिन जिल्हा परिषद सदस्या निलिमा पाटील, सुतगिरणीच्या संचालिका रंजना नेवे, रिना पाटील, प्रमिला सोनवणे, वृषाली बैसाणे यांच्या हस्ते एस. टी.बसची पांरपारिक पद्धतीने औटी भरुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या डॅा. निलिमा पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रंजना नेवे, पत्रकार सुनिल पाटील, श्रीकांत नेवे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीपप्रजवलन करुन उद्घाटन करण्यात आले.तसेच प्रवाश्यांचा सत्कार आगार प्रमुख निलेश बेंडकुळे, स्थानक प्रमुख जगदिश सोळंखे लेखापाल योगेश पोतदार, काटे साहेब , अनिल बाविस्कर यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पेढे देवुन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर महाजन यांनी केले.यावेळी डॅा.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी एस टी सोसायटीचे चेअरमन पंडीत बाविस्कर, कामगार संघटना अध्यक्ष भगवान नायदे, कामगार सेना अध्यक्ष धनराज देवराज, जिल्हा संघटक सचिव शाम धामोळे, काॅस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष रमेश अहिरे, इंटकचे सचिव डी. डी. चावरे, अतुल पाटील, डी. डी.कोळी, सनी शिरसाठ, सी पी कोळी, नाना कोळी, किरण चव्हाण, नरेंद्र जोशी, महेंद्र पठार ,जगदीश पाटील, सरताज पठाण, संजय लोहार यांच्यासह कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.