चोपडा प्रतिनिधी
येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शुक्रवार ’जागतिक अंडी दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारा अंतर्गत खिचडी सोबत उकडलेल्या अंड्यांचे वाटप करण्यात येऊन अंडी दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक सुनील चौधरी म्हणाले की, अंडी मध्ये शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारी नऊ प्रकारची अॅमिनो अॅसिड असतात.त्यासोबतच मोठ्या प्रमाणात खनिजे, प्रथिने व जीवनसत्त्वे असून ते शरीरासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले.याकामी शिक्षक भावेश लोहार, विजय पाटील, व्ही. )पी.महाले, संजय बारी, शिक्षकेतर कर्मचारी गोपीचंद पाटील, संजय पाटील यांनी परिश्रम घेतले.