चोपड्यात गावठी कट्टा सापडला एकाला अटक

0

चोपडा

दि 13 रोजी चोपडा ते धरणगाव रस्त्यावर शिरपूर बायपास जवळ योगेश भोई याला गावठी कट्टा व जिवंत काडतुस सह रंगेहाथ चोपडा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी पकडले आहे.
दि 13 रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास गुफ्त माहितीच्या आधारानुसार चोपडा धरणगाव रोडने पाटाच्या चारिकडून शिरपूर बायपास कडे पायी चालत असताना आरोपी योगेश पन्नालाल भोई (20)रा कोळबा ता चोपडा याची पोलिसांनी विचारपूस करून अंगाची झडती घेतली असता त्याच्या कमरेला सोळा हजार रकमेचे एक बनावट पिस्टल काळ्या रंगाचे धातूने बनविलेले व पैंटच्या उजव्या खिशात एक पितळी धातूचेजिवंत काडतुस आढळून आला होता.सदर पिस्टल व काडतुस बाळगणे याबाबत कुठलाही परवाना नसल्याने बेकायदेशीर रित्या बाळगल्या प्रकरणी आरोपी योगेश भोई याच्याविरिद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र पाटील,पो हे कॉ नारायण पाटील,रामचंद्र बोरसे,पो का प्रवीण हिवराळे, तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप राजपूत,शेषराव तोरे, पो का प्रकाश मथुरे,मिलिंद सपकाळे,यांनी संयुक्त रित्या ही कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.