रमेश जे पाटील | चोपडा
फक्त तीन दिवसात कोरोना लागण झाल्याचे जाहीर झाल्यानंतर आज दोन पैकी एकाचा मृत्यू झाल्याने चोपडा शहरातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.
चोपडा तालुक्यातील अडावद गावानंतर चोपडा शहरात दि ८ रोजी कोरोनाची एन्ट्री केल्याने शहरातील मल्हारपुरा व खुर्शीद अळी भागात दोन कोरोनाबाधित आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यात खुर्शीद अळी भागातील ५५ वर्षीय महिला व धुळे येथील नोकरीला असलेले मल्हारपुरा, चोपडा येथील ३८ वर्षीय तरुणांचा सहभाग होता,त्यापैकी आज ५५ वर्षीय महिलेने कोरोना आजारात आपला प्राण गमवावा लागला आहे.
जवळच अमळनेर तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना चोपडेकराना आता सावधान व्हावे लागणार आहे,अन्यथा अमळनेर ची वेळ चोपड्यावर येण्यास वेळ लागणार नाही.अमळनेर वाशियानी ज्या चूका केल्या त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे,म्हणून चोपडा तालुका वाशियानी लॉक डाउन मध्ये घरात बसण्याची शक्ती असताना अनेक जण बेफिकीरीने रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात.शेवटी पोलिसांचे मनुष्यबळ लक्षात घेता स्वतःला स्वतःची काळजी घेणे आवश्यक असताना बिना मास्क राहू नका,वारंवार हात स्वच्छ साबणाने दुधले पाहिजेत, कोरोटाईन केलेले असताना नाहक कोणाच्या संपर्कात जाऊ नका, या छोट्याछोट्या गोष्टी आमलात आणल्या तरच चोपडा तालुक्यातुन कोरोना हद्दपार होऊ शकतो अन्यथा चोपडा पासून अमळनेर लांब नाही हे लक्षात ठेवावे लागेल.
**तालुक्यातील अडावद नंतर चोपड्यात
कोरोना ची एन्ट्री ८ रोजी झाल्यानंतर आज चोपड्यात पहिला बळी गेला असून अडावद गावात एकूण चारपैकी दोन जणांचा मृत्यु झाला आहे.त्यामुळे चोपडा तालुक्यातील कोरोना मुळे एकूण तीन जण मयत झाले आहेत.कोरोना पोजिटिव्ह असलेले अडावद येथील आता दोन जण जळगावला उपचार घेत असून गावात २५ जण होमकोरोटाईन तर चोपड्यात १५ जण कोव्हिड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत.अडावद गावात एक जण २८ एप्रिल तर दुसरा ९ मे रोजी मयत झाले होते त्यानंतर आज चोपडा शहरात पहिला बळी गेल्याने अडावद व चोपडा शहर कडकडीत बंद असले तरी तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र बोटावर मोजण्या एवढं लोक मास्क वापरताना दिसतात.त्यामुळे ग्रामीण भागात स्थानिक गाव पुढाऱ्यानी देखील कोरोनाचे गांभीर्य अजिबात दिसत नाही.