चोपडा शिरपूर रस्त्यावर काळी पिवळी ट्रॅक्स पलटी

0

12 जण जखमी : परिवहन अधिकारी व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघाताची नोंद नाही

चोपडा दि 21 –
सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास चोपड्याहुन शिरपूर येथे प्रवाशी वाहतूक करणारी काळी पिवळी ट्रक्स पलटी होऊन मुक्ताईनगर व चोपडा तालुक्यातील एकूण 12 जण गँभिर जखमी झाले असून एकाला जळगाव सामन्य रुग्णालयात हलविले आहे.एम एच 18-ई 8647 ही ट्रॅक्स पलटी होऊन हा अपघात झालेला आहे.
या अपघातात बारकू सोनू भिल(35)रा हिसाळे ता शिरपूर, जगल्या बारेला(60-सेंधवा),प्रल्हाद बाबूलाल भिल(35-अनवर्धे),अनिता प्रकाश भिल(30-गलंगी ता चोपडा),अर्जुन प्रकाश भिल(12-गलंगी),अजय बारकू भिल(15)तर हालखेडा ता मुक्ताईनगर येथील सुह्या,पोत विकणारे फासपारधी समाजाचे सतानीबाई रज्जू पवार(40),भानुदास पवार(50),मनकर्णाबाई पवार(45),सिद्देश रज्जू पारधी(11),बबली निगा पवार(20),किरणबाई पारधी(60),हे गँभीर जखमी झाले असून हालखेडा ता मुक्ताईनगर येथील ह्या सुह्या,पोत विकणार्‍या फासेपारधी समाजाच्या परिवाराने एकच हंबरडा चोपडा उपजिल्हा रुग्णालयात फोडला होता.या जखमी सोबत लहान चिमुरडे बालके होती,काही जखमी तर काही अपघातात वाचले आहेत.यावेळी लहान बालके,मुली आपल्या आईवडिलांना जखमी पाहून रडून आक्रोश करत होते.यातील प्रल्हाद बाबूलाल भिल याला देखील जळगावला हलविले आहे.
यावेळी जखमी रज्जू पवार यांनी सांगितले की आम्ही ज्या काळी पिवळी गाडीत शिरपूर जात होतो त्या गाडीत आमच्या परिवाराचे किमान अठरा ते वीस प्रवाशी व अन्य चार पाच जण असे पंचवीस प्रवाशी व आमचे सामान असे भरगच्च भरलेली गाडी चालकाने भरधाव वेगात पळवून कुठेही वाहने नसताना गाडीवर ताबा सोडून देऊन गाडी पलटी करून हा अपघातात केला आहे.
जखमींना माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील यांची मदत:-हा अपघात चोपडा शहरापासून वीस की मी अंतरावर हातेड ते गलगी रस्त्यावर झालेला असताना शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील हे वढोदा ता चोपडा येथून येत असताना त्यांनी हा अपघात जवळून पहिला आणि आपली चारचाकी गाडी थांबवून अपघात ग्रस्तना मदत करून स्वतः एका खासगी 407 या गाडीतून सर्व प्रवश्यना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले होते.विकास पाटील यांनी लगेच सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना अपघाताची माहिती दिली होती,कारण चंद्रकात पाटील यांच्या तालुक्यातील हे जखमी होते.
यावेळी घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे सदस्य चोसाका व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे,सागर बडगुजर,नितीन निकम,प्रवीण पाटील,सूतगिरणी संचालक भाऊसाहेब पाटील,हे अपघात ग्रस्तना मदत करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात धावून गेले होते.
या जखमी वर डॉ पंकज पाटील,डॉ सुरेश पाटील यांनी उपचार केले.यातील एकाला जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती डॉ सुरेश पाटील यांनी सांगितले. त्याचे नाव मात्र कळू शकले नसले तरी ते गणपूर ता चोपडा येथील रहिवासी असल्याचे अन्य जखमींनी सागितले.

Leave A Reply

Your email address will not be published.