लासुर ता.चोपडा(वार्ताहर) : चोपडा तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांचा वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दामिनी पुरस्कार-2020 चा वितरण समारंभ सोहळा थाटात पार पडला. शहरातील बोथरा समाज मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचा अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे होते तर उद्घाटन माजी आमदार कैलास पाटील यांचा हस्ते संपन्न झाले.कर्तृत्ववान महिलांना मिसेस ग्लोबल वर्ल्ड (दक्षिण आफ्रिका) अनिताताई राठोड यांचा हस्ते दामिनी पुरस्कार वितरण करण्यात आले.तसेच जीवन गौरव पुरस्कार सत्रासेन येथील श्रीमती रमलीबाई रायसिंग भादले यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर चोपडा पं. स सभापती कल्पना पाटील, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी रा.काँ विजया पाटील,महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, न.पा.गटनेते जीवन चौधरी,माजी उपसभापती एम.व्ही पाटील सर, माजी जि प सदस्य इंदिरा पाटील, माजी जि प सदस्य घनश्याम पाटील, पीपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराथी, भाजप ज्येष्ठ नेते घनश्याम अग्रवाल, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, लासुर उपसरपंच अनिल वाघ, भरत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,श्रीमती.अनिताताई राठोड,सौ.आशा गजरे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान न्हायदे,सुत्रसंचलन जगदीश महाजन,तर आभार राकेश पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक आत्माराम पाटील,संदीप पाटील,देवीलाल बाविस्कर,भगवान न्हायदे,राकेश पाटील,अनिल पालीवाल,अनिल एन पाटील,अनिल पाटील,परेश पालीवाल यांनी परिश्रम घेतले.
हे आहेत पुरस्कारार्थी
आशा गजरे(अकुलखेडा), ज्योति पाटील(वडगाव), उज्वला म्हाळके(विरवाडे), कल्पना पाटील(सनपुले), आश्विनी देशमुख(जळगाव), अंजली बोरसे(मुंबई), डॉ.मनीषा एल महाजन(किनगाव), नूतन पाटील(नाशिक), योगीता पाचपांडे(जळगाव), रोशनी पवार(चोपडा), रुपाली नेवे(चोपडा), विमल साळुंखे(चोपडा), रंजना नेवे(चोपडा), ज्योती पाटील(भोरटेक), शकीला तडवी(जळगाव), रेणुका महाजन(पाचोरा), शुभांगी पाटील(हिंगोना), अंजुमबी पिंजारी(लासुर), करूणा चौधरी(धानोरा), रेना बारेला(कर्जाने), शीतल महाजन(लासुर).