Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»चोपडा येथील सूतगिरणीचे प्रगतीवर शरद पवार खुश !
    जळगाव

    चोपडा येथील सूतगिरणीचे प्रगतीवर शरद पवार खुश !

    By February 17, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा (प्रतिनिधी) :- चोपडा येथील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या समस्या दूर करण्यासाठी आणि एनसीडीसीतर्फे निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रगतीवर प्रगतीवरसहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

    तापी शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादित चोपडा येथील 25 हजार चात्यांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार अनिल पाटील, माजी आमदार सुरेश पाटील, सतिश पाटील, दिलीप सोनवणे, तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन कैलास पाटील, व्हाईस चेअरमन प्रभाकर पाटील, तहसिलदार अनिल गावीत आदी उपस्थित होते.

    श्री. पाटील म्हणाले, सुतगिरणीचे तीन वर्षातील काम वाख्याण्याजोगे आहे. अतिशय अडचणीतून या सुतगिरणीची उभारणी झालेली आहे. दहा हजार चारशे चात्यांवर सुरुवात झालेल्या या सुतगिरणीने पंचवीस हजार नऊशे वीस चात्यांवर सूत उत्पादन सुरु करुन जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. सुतगिरणीमुळे तालुक्यातील अनेक बेरोजगारांना तरुणांना काम मिळाले आहे. ही प्रगती सुरू राहण्यासाठी शासनतर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल.

    श्री. पवार म्हणाले, सुतगिरणी चांगली चालविण्यासाठी किमान 25 हजार चात्या हव्यात व त्यापुढे 40 हजारापर्यंत नेता यायला हव्यात. या सुतगिरणीने कमी चात्यातही चांगले सूत तयार केले. तापी सहकारी सुतगिरणीतील सूत महाराष्ट्राबाहेर जात आहे. निर्यातीपर्यंत आपण गेल्याने सुतगिरणीला नफा मिळत आहे. चोपड्याचा शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना इतरांना देणे योग्य नाही. शेतकऱ्याने कष्ट करून कारखाना उभा केला आहे. सर्व संबंधितांना एकत्रित घेऊन कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि सभासदांच्या हातात कारखाना देण्यासाठी सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याच्या मालाच्या किंमती इतर वस्तूंच्या तुलनेत वाढल्या नाही असे नमूद करून शेतकऱ्याला त्याच्या श्रमाची योग्य किंमत मिळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

    प्रारंभी श्री. पाटील आणि श्री. पवार यांनी सुतगिरणीची पाहणी केली. या सोहळ्यास सुतगिरणीचे संचालक, सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif