चोपडा– शहरातील अरूण नगर भागात नाल्याचे वर राहणाऱ्या श्रीमती लिलाबाई दगडू चौधरी या त्यांची वयोवृद्ध आईसह दूग्ध व्यवसाय करून पोट भरतात.
त्यांचे शेजारी एका सेवानिवृत्त बस वाहकाने घर बांधायला सूरूवात केली 3 मजली घर बांधले आणि दक्षिणेकडे दरवाचा नसतांना तो तयारकेला. प्रत्यक्ष जागेपेक्षा जास्त विस्तारीत जागेवर बांधकाम केला त्यामूळे चौधरी कूटूंबीयाचे घराचा वापर बंद होईल व मुळातच कमी रूंदीचा जाण्यायेण्याचा वापर अधिक अरूंद होईल अशा तर्हेने रस्ता वर अतिक्रमण करून बांधकाम चालत आहे . त्याला हरकत घेतली असता ते व त्यांचा मूलगा या महिलांचे अंगावर धावून जातात दमदाटी करतात म्हणून चोपडा पो स्टे ला एफ आय आर एन सी ही दाखल केली आहे. नगर परिषद चोपडे यांचे कडे तक्रार केली होती त्यांनी तीन दिवसाचे आत ते अतिक्रमण पाडून टाका अशी नोटीसही 16नोव्हेंबर 2017ला व 2डिसेंबर 2017ला महाराष्ट्र नगरपरिषद कायदा 1965चा संदर्भासह बजावल्या पोलीसांनी ही समज दिली. पण त्यांनाही सदर व्यक्तींनी दाद दिली नाही. त्यामुळे आता नगरपरिषद चे मूख्याधिकारी श्री बबन तडवी यांनी घरपट्टी पाणीपट्टी चे सह पूरावे मागितले त्यानूसार गेल्या अनेक वर्षापासून चे पूरावे लिलाबाई मागितले दाद मागणाऱ्यालाच पूरावे मागून आरोपीप्रमाणे ते वागणूक देत आहेत . व मूळ प्रश्नाला बगल देत आहेत. पूढिल कार्यवाही नगरपरिषद ने करावी म्हणून या अन्यायाविरूद्ध लिलाबाई चौधरी आई यांनी 3मे 2018 पासून चोपडा नगर परिषद समोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे त्यांच्या या अन्याविरूद्धच्या आंदोलनाला कामगार नेते काॅ अमृतराव महाजन यांनी पाठिंबा दिला आहे . आज उपोषणाचा दूसरा दिवस आहे