चोपडा प्रतिनिधी |
शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा नगरसेवक महेंद्र एकनाथ धनगर यांची चोपडा नगरपालिकेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नुकतीच निवड केल्याची माहिती त्यांनी स्वतः पत्र देऊन दिली आहे. यापूर्वी चोपडा नगरपालिकेत शिवसेनेचे गटनेतेपदी महेश बाबूराव पवार हे होते त्यांनी दिनांक ५ मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे महेंद्रा एकनाथ नगर यांची नव्याने जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवड केल्याचे पत्र चोपडा नगरपालिकेत प्राप्त झाल्यानंतर सदरची निवड झाल्याची माहिती स्वतः नगरसेवक महेंद्र धनगर यांनी दिव्य मराठीला दिली आहे त्यामुळे चोपडा नगरपालिकेत आता शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.चोपडा नगरपालिकेच्या निवडणुकीत धनगर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते, अनेक महिन्यांपासून पक्षाकडे त्यांनी या पदासाठी मागणी केली होती त्यांना या पदावर आता काम करता येणार आहे.