चोपडा – व्यवसाय सुलभता Ease of Doing Business (EoDB) च्या अनुषंगाने नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या (मालमत्ता, पाणीपुरवठा, ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसाय परवाने)अशा एकंदरीत ३८ सेवा आपले सरकार पोर्टल वरून कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. सदर सेवेचा लाभ घेणे करिता https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टल किंवा चोपडा नगरपरिषद कार्यालयाच्या संबंधित विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन मुख्याधिकारी श्री.अविनाश गांगोडे व नगराध्यक्ष सौ. मनीषा चौधरी यांनी केलेले आहे.