चोपडा प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या मतदान जनजागृती अभियानाच्या अंतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघात कामगार कल्याण मंडळ व शिक्षण विभाग पंचायत समिती चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने चोपडा एस टी महामंडळात आवारात चालक वाहक व प्रवाशी यांना मतदान व मतदार जनजागृतीबाबत मागर्दर्शन चोपडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ भावना भोसले, सहाय्यक नोडल अधिकारी युवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास आगारप्रमुख संदेश क्षीरसागर ,केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, वंदना बाविस्कर, गुलाब देवराज,दिपक पाटील, प्रांजली पाटील ,मिलिंद पाटिल, संभाजी पाटील, यांच्यासंह प्रकल्प प्रमुख सुमित्रा अहिरे,अशोक साळुंखे, नरेंद्र सोनवणे, मिनाक्षी गजरे, सुधाकर चौधरी, अशोक सैंदाणे, अंबादास सोनवणे, प्रविण माळी, भाऊसाहेब चव्हाण, श्रावण जाधव, निळकंठ शिरसाठ, अरुण पाटील , राममूर्ति रायसिंग सह कामगार कल्याण केंद्राचे अजय अहिरे अरुण पाटील एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष भगवान नायदे, प्रभाकर महाजन व कर्मचारी ,प्रवाशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.