भुसावळ (प्रतिनिधी)- यावल नाक्याजवळ सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे फक्त ५०० मिटर रस्त्याचे काम होत असून त्यात कंत्राटदाराकडून मुरूम व मातीचा वापर होत असल्याने तक्रार करून हे काम बंद न पाडता काम सुरू राहू द्या मात्र चुकीचं काम नका करू आणि ती पिवळी माती उचलण्याचे सांगितलं तसेच असून शहरात कुठेही चुकीच्या पध्दतीचे कामे करू देणार नाही असा खणखणीत इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी दिला. ते मंगळवार १८ रोजी त्यांच्या शनीमंदीर वार्डातील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी सचिन चौधरी पुढे म्हणाले कि,सोशल मिडीयावर आपल्या एका प्रभागातील अभियंता असलेल्या मित्राने यावल रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची पोस्ट टाकली होती.ते पाहुन आम्ही तेथे जाऊन कामाची गुणवत्ता बघितली असता माती व मुरूमचा वापर केला जात असल्याने संबंधित विभागाच्या अधिका-यांना बोलवून तक्रार करून काम बंद पाडले.या विषयाची पोस्ट टाकणा-या अभियंत्याला नोकरीवरून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे,मात्र दर्जेदार कामासाठी अशा कोणत्याही जागृत नागरिकाच्या पाठीशी राष्ट्रवादी राहणार आहे.कामे झाली तर आनंदच राहील पण ५०० मीटरच्या रस्त्यात सुध्दा भ्रष्टाचार तर बाकीचे काय होईल.६ महीने सुध्दा हा रस्ता टिकणार नाही असे सचिन चौधरी यांनी स्पष्ट केले.तर नगरसेवक हाजी आशिक खान यांनी कब्रस्तान लगत असलेल्या सर्व्हे क्र.३१/१ या लक्ष्मिनारायण मंदीर ट्रस्टची जागा बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचे व नगरपरिषदेची बैठक तीन महिने होत नसल्याचे तर नगरसेवक उल्हास पगारे यांनी शहरातील विविध भागात होत असलेल्या अतिक्रमणावर प्रकाश टाकला. यावेळी नगरसेवक दुर्गेश ठाकूर,नितीन धांडे,हाजी जाकीर शेख,आशिष बोरसे,तम्मा पहेलवान,सनी गोने आदी उपस्थित होते.