यावल (प्रतिनिधी) कोरोना या जिवघेण्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावल तालुक्यातिल चुंचाळे ग्रामपंचायतीचे कर्तव्यदंक्ष ग्रा.प.सदस्य सुकलाल राजपुत व ग्रामसेवीका प्रियंका बावीस्कर यांनी आशा वर्कर यांच्या समस्या जाणून घेत तात्काळ खबरदारीची उपाययोजना करुण थर्मल गण व आँक्सिमिटर देऊन प्रत्येक वार्डात कोरोना बाबत सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
त्यात एक शिक्षक व आशा वर्कर,अगणवाडी सेवीका यांना या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आले असून तरी ग्रामस्थानी आरोग्य कर्मचारी आशा वर्कर यांना माझे गाव माझी जबाबदारी या सर्वेक्षणास योग्य प्रतिसाद देऊन आपले गाव कोरोना मुक्त ठेवावे असे आवाहान उपसरपंच नजिमा तडवी यांनी केले यावेळी सरपंच सुंनदा पाटील,उपसरपंच नजिमा तडवी,ग्रा.प.सदस्य सुकलाल राजपुत,अरमान राजपुत सामाजिक कार्यकर्ते रहिमान तडवी ग्रामरोजगार सेवक दिपक कोळी,संगणक आँपरेटर सुधाकर कोळी शिपाई मनोज पाटील आदी उपस्थित होते

