चिवास महिला मंडळातर्फे आयोजित योग व निसर्गोपचार शिबिरात डॉ. नेमाडे दाम्पत्यांचे मार्गदर्शन

0

जळगाव दि.17 :-

चिवास महिला मंडळातर्फे योग व निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अर्चना अट्रावलकर यांच्या निवासस्थानी 17 रोजी डॉ.निशीगंधा सुहास नेमाडे व डॉ.सुहास भालचंद्र नेमाडे यांचे योग व निसर्गोपचारावर शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. नेमाडे व्दयींनी उपस्थित महिलांच्या प्रश्नांना व शंकांना समर्पक उत्तरे दिलीत.
चिवास महिला मंडळ नेहमीच महिलांसाठी आरोग्यदायी अशा विविध शिबिरांचे आयोजन करित असते. त्याचाच एक भाग म्हणून 17 रोजी अर्चना अट्रावलकर यांच्या निवासस्थानी योग व निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. निशीगंधा सुहास नेमाडे व डॉ. सुहास भालचंद्र नेमाडे यांचे योग व निसर्गोपचारावर महिलांसाठी आरोग्यदायी असे शिबिर घेण्यात आले. यात महिलावर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. यावेळी महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ.व्दयींनी समर्पक अशी उत्तरं दिलीत. यातील डॉ. निशीगंधा ह्या बॅचलर नॅचरोपॅथी, योगीक सायन्स ,अ‍ॅक्युप्रेशर, सुजोक,मॅग्नोटोथेरपी रेकी मास्टर आहेत. तर डॉ.सुहास भालजंद्र नेमाडे हे बॅचलर इन नॅच्यूरोपॅथ, योगीक सायन्स,मास्टर डिप्लोमा इन अक्युप्रेशरीस्ट असून त्यांची ,अ‍ॅक्युप्रेशरवर 700 ते 800 शिबिरं योग- निसर्गोपचारावर 100 पेक्षा जास्त शिबिरं झाली आहेत. शिबीर यशस्वीतेसाठी सौ अर्चना अट्रावलकर,सौ अलका अट्रावलकर,वैशाली वाणी,अनघा वाणी व मंजू वाणी व कार्यकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.