चिवास महिला मंडळाच्या अध्यक्षपदी अर्चना अट्रावलकर

1

जळगाव;-येथील चिवास महिला मंडळाच्या अध्यक्षपदी अर्चना नितीन अट्रावलकर यांची नियुक्ती करण्यात आली . चिवास महिला मंडळाची वार्षिक बैठक संगीता दीपक अट्रावलकर यांच्या सुनिकेतन निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी चिवास महिला सभासद बहुसंख्येने उपस्थित होत्या . गतवर्षातील कार्याचा आढावा शुभदा वाणी यांनी सादर केला. तर अर्चना अट्रावलकर यांनी खर्चाचे विवरण पत्रक सादर केले . या प्रसंगी सर्वांनुमते अर्चना अट्रावलकर यांची पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. उपाध्यक्ष अर्चना सुरेश वाणी ,कोषाध्यक्ष वैशाली उमेश वाणी , सचिव वैशाली किशोर अकोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले .

1 Comment
  1. सतीश वाणी says

    अभिनंदन.

Leave A Reply

Your email address will not be published.