चिमुकल्या कलाकाराला दिली आठवण भेट

0

धरणगाव –– “कर्तव्य बहुउद्देशिय” या संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी गुड शेपर्ड इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये इयत्ता ३ रीत शिक्षण घेणाऱ्या रेहांश बिवाल या चिमुकल्या कलाकारला अनोखी आठवण भेट देऊन त्याच्या कलेला प्रोत्साहन दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , कर्तव्य बहुउद्देशिय या संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी नियमितपणे शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना पुस्तके व विविध शैक्षणिक साहित्य भेट स्वरूप देत असतात. मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली म्हणजे त्यांना अजून चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. गुड शेपर्ड स्कुल मध्ये शिक्षण घेणारा रेहांश बिवाल ( इयत्ता ३ री ) हा विद्यार्थी हार्मोनियम च्या सहाय्याने ‘राष्ट्रगीत – जन गण मन’ अतिशय उत्तमरित्या सादर करत असलेला व्हिडीओ सुनिल चौधरी यांनी पहिला. आपल्या गावात एक छोटासा चिमुकला एवढा छान कलाकार आहे , संगीत कलेची त्याला आवड आहे हे पाहून त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुनिल भाऊंनी त्याला आपल्या घरी बोलवून  ‘कॅसियो’ हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट भेट स्वरूप दिले व त्याच्या कलागुणांचा सन्मान केला. या कार्यक्रम प्रसंगी “कर्तव्य बहुउद्देशियचे” अध्यक्ष सुनिल चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सुरेखा चौधरी , बालकलाकार रेहांश बिवाल , रेहांश चे काका आकाश बिवाल , दिव्य मराठीचे बी. आर. महाजन , गुड शेपर्ड स्कुलच्या प्राचार्या चैताली रावतोळे , वर्गशिक्षका ग्रीष्मा पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.