Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चिपळूणमधील तिवरे धरण फुटले ; २३ जण बेपत्ता, दोन ठार
    ताज्या बातम्या

    चिपळूणमधील तिवरे धरण फुटले ; २३ जण बेपत्ता, दोन ठार

    By July 3, 2019Updated:July 3, 2019No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिपळूण :- चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला आहे. मंगळवारी रात्री ८ ते ९च्या सुमारास ही घटना घडली असून यात २३ ते २५ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दोन मृतदेह सापडले आहेत. या ठिकाणी एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे.

    रत्नागिरीतील तिवरे धरणाचा गुगल मॅपवरील फोटो

    कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसाचा जोर इतका वाढला की तिवरे धरण फुटले आहे. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने एका बाजूला भगदाड पडले आहे. त्यामुळेच शेजारील गावांमध्ये सतर्कतेचा इशाराही दे्ण्यात आला आहे. ही घटना समजताच वरिष्ठ अधिकारी, पोलीस आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. धरण फुटल्याने ओवळी, रिक्टोली, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे. २००० साली या धरणाचं काम पूर्ण झालं होतं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या धरणाच्या दुरूस्तीकडे कोणतंही लक्ष देण्यात आलेलं नव्हतं अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. इतकंच नाही तर तिवरे धरणाला गळती लागल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली होती. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif