चिनावल, ता.रावेेर(वार्ताहर) : चिनावल येथील पुरातन श्रीराम मंदिरात अयोध्या श्रीराम मंदिर भूमिपूजन समारंभ निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई व दि.५ रोजी गावातील महिलांनी सोशल डिस्टनसिग चे पालन करून दिपोत्सव साजरा केला या आधी दुपारी १२ वा.पूजा अर्चना व आरती करण्यात आली.
मंदिरात विधीवत पूजा व आरती करून अयोध्या श्रीराम मंदिर भूमीपूजनास शक्ती मिळून कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी फक्त पूजारी व सहाय्यक व अन्य ३ते ४ जण उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी घेण्यात आली सदर वेळी श्रीराम मंदिर संस्थान चे विश्वस्त यांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचना चे पालन केले. मदीरासह संपूर्ण गावात आज उल्हासमय व अध्यात्मिक वातावरण होते. मंदीरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलहाराने सजवण्यात आले आहे. गावातील घरोघरी दिप लावून गावात दिपोत्सव साजरा झाला येथील कार्यक्रमातून अयोध्या श्रीराम मंदिर भूमिपूजन व निर्माणासाठी शुभेच्छा दिल्या.