चिनावल विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांनचा गौरव

0

चिनावल, ता.रावेर : येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी आणि बारावी यामध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना उत्कर्ष एज्युकेशन फौंडेशन औंध,पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन किशोर  बोरोले, प्राचार्य जी.पी.लोखंडे, उपमुख्याध्यापक एच.आर.ठाकरे, पर्यवेक्षक पी.एम.जावळे,एम.एस.महाजन  उपस्थित होते.

इयत्ता बारावी मध्ये समान गुण मिळवून प्रथम आलेले चेतना खुशाल नेमाडे व तेजस प्रमोद जावळे यांना रुपये तीन हजाराचा धनादेश आणि इयत्ता दहावी मधून प्रथम आलेली  आचल चंद्रशेखर किरंगे हीस चार हजार रुपयाचा धनादेश संस्थेचे चेअरमन किशोर बोरोले व प्राचार्य जी.पी.लोखंडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सदर विद्यार्थ्यांनी शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली त्याबद्दल चेअरमन किशोर बोरोले यांनी अभिनंदन करून उत्कर्ष फाउंडेशन पुणे यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन एम.एस. महाजन यांनी केले तर जी.एस.नारखेडे, आर.ए.होले,योगेश बोरोले,सुराज तडवी,ए.व्ही.राणे,जी.बी.चोपडे, सतिष चौधरी यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.