चिनावल, ता. रावेर (वार्ताहर) : सन १९९२ च्या अयोध्या कारसेवेत सहभागी होवून श्रीराम मंदिर होणे काही त्या वेळेस बंदी राहिलेले येथील भास्कर हरि साळुंके यांचा आज चिनावल येथील महादेव वाड्यात शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
चिनावल येथून कारसेवेसाठी भास्कर साळुंके हे स्व.माजी खा.गुणवतराव सरोदे यांचे सोबत अयोध्या गेले होते. अयोध्येत आज प्रत्यक्षात श्रीराम मंदिर भूमिपूजन झाले व मंदीर ही लवकरच पूर्ण होईल त्याचा आनंद भास्कर साळुंके यांना आहे व त्यानी राम मंदिर होणे काही उचललेला खारिचा वाटा का होईना या साठी त्याच्या साळुंके परिवार ,समाज बांधव महादेव वाड्यातील नागरिकांनी सपत्नीक सत्कार केला. यावेळी महादेव वाडा ,समाज बांधव व ग्रामस्थ हजर होते.