चाळीसगांव :-(प्रतिनिधी ) क्रिशन्स फाउंडेशन दिल्ली या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल ऑनलाईन आर्ट कॉम्पिटिशन 2020 या चित्रकलेतील स्पर्धेमध्ये चाळीसगाव शहरातील चित्रकार धर्मराज खैरनार यांना एक्सलंट अवार्ड पुरस्कारासाठी त्याच्या चित्राची निवड करण्यात आली आहे .या स्पर्धेत खैरनार यांनी जलरंग माध्यमात रेखाटलेल्या वारकरी या चित्राची एक्सलंट अवार्डसाठी निवड करण्यात आली असून. चित्रात हातात टाळ घेऊन विठ्ठलाच्या भक्तीत मग्न असलेला वारकरीचे रेखाटन केलेले आहे.सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.