चितोडे वाणी समाज प्रगति प्रतिष्ठानतर्फे ऑनलाईन महिला दिन

0

पुणे (प्रतिनिधी) – चितोडे वाणी समाज प्रगति प्रतिष्ठान, पुणे आयोजित ऑनलाईन 8 मार्च 2021 जागतिक महिला दिन संध्याकाळी 7 ते 10.30 पर्यंत आयोजित करण्यात आला. 8 मार्च 2020 रोजी या महिला दिनानिमित्त पहिला कार्यक्रम घेण्यात आला.

हे दुसरे वर्ष. सध्या कोरोनासारखी महामारी असल्यामुळे या वर्षी ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. याकार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र, जपान तसेच ऑस्ट्रेलियामधून चितोडे वाणी समाजातील महिलांनी सहभाग घेतला व या कार्यक्रमाची शोभा वाढविली.

कार्यक्रमाची सुरुवात कु.प्रतिक्षा योगेश वाणी हीच्या स्वागत गीताने झाली. चितोडे वाणी समाज प्रगती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री. दिपकदादा वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा.सौ. मेधाताई कुलकर्णी यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. तसेच मार्गदर्शक म्हणून चितोडे वाणी समाजातील मुंबई शहर पोलिस निरीक्षक सौ. वैशाली श्रावगी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या महिलांना सायबर हल्ल्यापासून कसा बचाव करावा याबद्दल सुंदरसे मार्गदर्शन केले.

कार्यक्रात आपल्या समाजातील विशेष कार्य केलेल्या महिलांना सन्मानीत करण्यात आले. त्यामध्ये सौ. स्वप्ना प्रकाश वाणी, ठाणे यांनी स्विमिंगचे फायदे व स्विमिंग केल्यामुळे आपण आरोग्य असे चांगले राखू शकतो याचे सुंदर मार्गदर्शन केले. सौ.अनिता सराफ यांनी ही मार्गदर्शन केले. सौ. अश्विनी पंडित (गजऋषी) मुंबई या पीएच.डी. आहेत.
यांनी सुद्धा 12 वी नंतर व तरुण मुला मुलींसाठी उपलब्ध असलेले कोर्सेस व उद्योगाच्या संधी याबद्दल सुंदर मार्गदर्शन केले. कु. रोमल अकोले ही आत्ताच सी.ए. झालेली आहे. ती सी.ए. कशी झाली.
सोशल नेटवर्कींगपासून कसे वेगळे रहावे, अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले. सौ. अंजलीगडे, बऱ्हाणपूर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला काही प्रतिष्ठीत महिला व उद्योजक महिला यांनी काही मार्गदर्शन आपल्या समाजातील महिलांसाठी केले.

महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन चितोडे वाणी समाज प्रगती प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष मा.श्री. दिपकदादा वाणी, उपाध्यक्ष श्री. जयप्रकाश यावलकर, सचिव श्री. धीरज पाटील, पराग अकोले, संदीप वाणी, योगेश वाणी, प्रितम गडे, जयेश अकोले, सौ. मनिषा गजऋषी यांनी केले. सूत्रसंचालन सौ. ज्योती वाणी यांनी केले.

कार्यक्रमात महिला आयोजकांनी आपले मत व्यक्त केले. डॉ. नालंदा वाणी, सौ. विनया पाराशर, अपेक्षा खरे यांनी ऑनलाईन मनोगत व्यक्त केले. तसेच उद्योजक महिला यांनी आपले
मनोगत व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे सादर केले. कु. शितल अकोले सौ. स्नेहा सचिन गडे यांनी

समाजातील यावल येथील नगरसेविका सौ. कल्पना वाणी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

नाशिक येथील डॉ.सौ. ज्योत्स्ना गडे यांनी सुद्धा कोरोना परिस्थिती काळात त्यांनी कशा पद्धतीने कार्य केले, कार्य काय असते, कोरोना पासून बचाव कसा करावा हे सर्व समाज भगिनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाबरोबरच करमणुक म्हणून कु. जान्हवी गडे व श्री. संदेश गडे यांनी ऑनलाईन फन ॲक्टिव्हिटी घेऊन सर्वांचे मनोरंजन केले. मनाला चालना मिळावी म्हणून वेग-वेगळे गेम तर घेतलेच त्याचबरोबर शरीर निरोगी राहण्यासाठी कु. श्रृती अंधारे यांनी झुंबा डान्स व सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक दाखवून महिलांकडून करवुन घेतले.जपान येथून सौ. वृशाली वाणी यांनीसुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. मनिषा गजऋषी यांनी केले. असा हा सुंदर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी साधारणत: 220 महिला ऑनलाईन जॉईन झालेल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.