चिखली बु. येथील तरुणाची आत्महत्या

0

यावल  : तालुक्यातील चिखली बु. येथील तरुणाने बेरोजगारीच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. खुशाल उर्फ सुरेश विठ्ठल पाटील (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी फैजपुर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खुशाल हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून नोकरीच्या शोधात होता. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपूर्वी ज्या म्हशीवर घराचा उदरनिर्वाह सुरू होता, तिचा अचानकपणे चाऱ्यातून विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. या घटनेमुळे त्याला नैराश्य येवून गेल्या दोन महिन्यांपासून त्याचे मानसिक संतुलन ढासळलेले होते. याच मानसिकेत त्यांने आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, घराचे शेतातून घरी आले तेव्हा दरवाजा दोघी बाजूंनी बंद आढळला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता खुशालने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.