धरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील कोरोना बाधित दोन रुग्णाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे धरणगावात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या ७ वर पोहचली आहे. दरम्यान, एकाच दिवसात दोन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे धरणगावात भितीचे वातावरण पसरलेले आहे.
आज सकाळी गोदावरी कोविड रूग्णालयात उपचार सुरू असतांना शहरातील मराठे गल्ली परिसरातील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून हा रुग्ण व्हेंटीलेटर होता. तर दुसरा रुग्ण शहरातीलच चिंतामणी मोरया परिसरातील रहिवाशी होता. मागील काही दिवसापासून या रुग्णावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, मयतावर शासकीय नियमाप्रमाणे अत्यंत काटेकोर पद्धतीने नियमांचे पालन करत साकेगाव व नाशिक येथेच अंत्यविधी केला जाणार असल्याचे कळते. शहरातील परिस्थितीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रांतधिकारी विनय गोसावी, सहा.पोलीस निरीक्षक पवन देसले, शिवसेना गटनेते पप्पू भावे, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ हे लक्ष ठेवून आहेत.