लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-येथील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील तब्बल ८ शिक्षक तसेच १ कर्मचाऱ्याचा अहवाल पोजिटिव्ह आल्याने गावात खळबळ माजली असून इतर शिक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
यात लासुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १ शिक्षक तसेच महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे तब्बल ७ शिक्षक तसेच १ कर्मचाऱ्याचा समावेश आहे.अजूनही काही शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अशी आहे आकडेवारी-
जिल्हापरिषद प्राथमिक शाळा-शिक्षक १
म.गां.माध्यमिक विद्यालय-शिक्षक ७,कर्मचारी १


