चिंताजनक : भुसावळात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू

0

भुसावळ : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येसह मृतांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, भुसावळात आज सापडलेल्या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मयतची संख्या सहा झाली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवडाभरापासून शहरात कोरोनाने कहर केला आहे. भुसावळात आज सकाळी रविवारी (ता. १०) मोमीन पुरा व शनी मंदिर वार्ड या दोन भागात दोन रुग्ण सापडले आहे. त्यातील शनी मंदिर वॉर्डातील ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या २३ झाली आहे. यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे १७ रुग्णावर उपचार सुरु आहेत.

शहरात समतानगर येथे पहिला रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सिंधी कॉलनी, शांतीनगर, आंबेडकर नगर, गंगाराम प्लॉट, पंचशील नगर, महेश नगर, जाम मोहल्ला, खडका रोड, भजी गल्ली, इंदिरानगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मोमीन पुरा, काझी प्लॉट आदी परिसर कोरोनाने गाठला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.