Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    • सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा एकोणिसावा दिवस
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»चिंताजनक ! पहूर येथे आज ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह
    जळगाव

    चिंताजनक ! पहूर येथे आज ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह

    By July 15, 2020No Comments113 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर, ता .जामनेर (वार्ताहर) : कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याची माहिती पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी डॉ . हर्षल चांदा यांनी दिली. पहूर येथे बाधितांची संख्या आता ५७ झाली आहे.

    जामनेर तालुक्यातील पहूर येथे दिवसेंदिवस कोरोना संक्रमणाची साखळी घट्ट होत आहे. आज बुधवारी कोरोना योद्ध्या ४५ वर्षीय जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकासह पहूर पेठ येथील एकाच कुटूंबातील मूलगा व आई तसेच संतोषीमाता नगर येथीलही एकाच कुटूंबातील मूलगा आणि वडिल अशा एकूण ५ जणांना बाधा झाली आहे. तसेच वडगांव पाठोपाठ हिवरखेड्यातही कोरोनाने शिरकाव केला असून ८५ वर्षीय आजीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तसेच शेंदूर्णी येथेही ३५ वर्षीय एक महीला बाधित झालेली आहे .प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    योद्ध्या अंगणवाडी सेविका , रुग्णालयातील स्विपर बॉय, सफाई कर्मचारी महिलेनंतर वाकोद जिल्हा परिषद केंद्र शाळेतील प्राथमिक शिक्षक व पहुर पेठ येथील रहीवासी असलेल्या कोरोना योद्ध्या शिक्षकांची ड्यूटी काही दिवसांपूर्वी जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील चेक पोस्टवर होती. त्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.त्यांचा अहवाल आज पॉझीटीव्ह आला आहे.

    कोरोना योद्ध्यांनो काळजी घ्या –
    कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स ,परिचारिका, परिचारक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर्स, आपले सफाई कर्मचारी, पोलीस, शिक्षक, महसूल कर्मचारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील अधिकारी -कर्मचारी कोरोनाशी लढा देताहेत. कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, तोंडाला मास्क बांधावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. आवश्यकते नुसार वैद्यकिय सल्ला घ्यावा.
    –डॉ .हर्षल चांदा
    वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल ऑफिसर,ग्रामीण रुग्णालय, पहूर

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026

    शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif