नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिवसेंदिवस कोरोनाची तिसरी लाट वाढतांना दिसत असून देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ४७ हजार ४१७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या २७ टक्के अधिक आहे.
गेल्या काही दिवसांतील ही उच्चांकी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ८४,८२५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात ११ लाख १७ हजार ५३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १३.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ५,४८८ वर पोहोचली आहे.
India reports 2,47,417 fresh COVID cases (27% higher than yesterday) and 84,825 recoveries in the last 24 hours
Active case: 11,17,531
Daily positivity rate: 13.11%Confirmed cases of Omicron: 5,488 pic.twitter.com/kSvYNqJHb2
— ANI (@ANI) January 13, 2022
देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी १५.०८ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. मंगळवारी आढळलेल्या १ लाख ६८ हजार ६३ कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत बुधवारी १ लाख ९४ हजार ७२० कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४४२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.०१ टक्के नोंदवण्यात आला होता.
आतापर्यंत महाराष्ट्रात २६५ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू…
कोविड-१९ मुळे आतापर्यंत महाराष्ट्रातील २६५ पोलिस कर्मचार्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात मुंबई पोलिस दलातील सर्वाधिक १२६ जणांचा समावेश आहे. सध्या राज्यातील पोलिस दलांतील २,१४५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती राज्य पोलिसांकडून देण्यात आली आहे.
कोरोनाबाधितांच्या डिस्चार्ज धोरणात बदल
दरम्यान, देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज धोरणात बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिली होती.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या संसर्गग्रस्तांना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून सात दिवसांनी डिस्जार्च केले जावू शकते. दरम्यान, सातत्याने तीन दिवसांपर्यंत रूग्णांची प्रकृती सुधारली आणि त्याला ताप आला नाही तर डिस्चार्ज करतांना त्यांची कोरोना तपासणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये देखील सुधारणा दिसून येत असेल आणि त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी ऑक्सिजन सपोर्टशिवाय लागोपाठ तीन दिवसांपर्यंत ९३ टक्क्यांहून जास्त राहत असेल तर रूग्णाला डिस्चार्ज केले जावू शकते, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात २२.३९ टक्के संसर्गदर आहे. तर, बंगालमध्ये ३२.१८, दिल्ली २३.१, उत्तर प्रदेश ४.४७ मध्ये संसर्गदर अधिक असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन बऱ्याच वेगाने पसरत आहे. दक्षिण आफ्रिका, ब्रिटेन, कॅनडा तसेच डेनमार्क मध्ये आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटनुसार ओमायक्रॉन मुळे रूग्णालयात भरती होण्याचा धोका डेल्टाच्या तुलनेत बरीच कमी आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली आहे.