चिंताजनक ! जिल्ह्यात आज ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू ; ९२१ नवे रुग्ण

0

जळगाव : जिल्ह्यात आज ९२१ नवे रुग्ण आढळून आले. तर आज ५०४ जण बरे होवून घरी गेले आहे. चिंतेचा विषय असा की आज ७ रुग्णांचा मृत्यू झालाय.

आज ९२१  रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात बाधिताचा एकूण आकडा ७५ हजार ४१५ वर गेला आले. त्यापैकी ६४ हजार ७१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ९ हजार २२३ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज ७ रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृताच आकडा हा १४७४ वर गेला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- २७०, जळगाव ग्रामीण-६३, भुसावळ-३२, अमळनेर-००, चोपडा-१८१, पाचोरा-१९, भडगाव-१२, धरणगाव-६३, यावल-१८, एरंडोल-१२२, जामनेर-६७, रावेर-५, पारोळा-२४, चाळीसगाव-४३, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०१ आणि इतर जिल्ह्यातून ०१ असे एकुण ९२१ बाधित रूग्ण आढळून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.