जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही. दररोज आठशे- हजार रुग्ण आढळून येत आहेत, तसेच मृत्यूचे सत्रही थांबताना दिसत नाही. जिल्हा प्रशासनाला आज सायंकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये ८८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, आज दिवसभरात २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा एका दिवसातील हा उच्चांकी आकडा आहे. दिलासादायक बाब अशी की, हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरात मागील केल्या दिवसापासून मोठ्या बाधित रुग्ण संख्येने आढळून येत होती. मात्र आज रुग्ण संख्या कमी आढळून आलीय त्याचसोबत आज बरे होणार्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. जळगाव शहरात आज 75 बाधित रुग्ण आढळले आहे त्यात आज तब्बल १८३ रुग्ण हे बरे झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ३४२ वर गेली आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विचार केला असता रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. जळगाव ग्रामीण-३१; भुसावळ-६५; अमळनेर ४७, चोपडा 48, पाचोरा-56; भडगाव 36; धरणगाव- 83; यावल-19; एरंडोल-41; जामनेर-88; रावेर-14; पारोळा-66; चाळीसगाव-136; मुक्ताईनगर-23; बोदवड-46 व बाहेरच्या जिल्ह्यातील 15 रूग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज 824 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्या रूग्णांचा आकडा २५ हजार १२८ वर गेला आहे. तर आज दिवसभरात २० मृत्यू झाले असून आजवरच्या मृतांची संख्या ९१४ इतकी झाली आहे.