Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चिंचोलीजवळ ट्रॅक्टर–पिकअप धडक; सिमेंट  कामगार ठार
    गुन्हे वार्ता

    चिंचोलीजवळ ट्रॅक्टर–पिकअप धडक; सिमेंट  कामगार ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 20, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिंचोलीजवळ ट्रॅक्टर–पिकअप धडक; सिमेंट  कामगार ठार
    जळगाव : तालुक्यातील चिंचोली गावाजवळ सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला समोरून येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात संजय नामदेव सोनवणे (वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    गेंदालाल मिल परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असलेले संजय सोनवणे हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मालधक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या वाहतूक करण्याचे काम ते नियमितपणे करीत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते इतर मजुरांसह ट्रॅक्टर (क्र. एमएच १९ बीजी ६०७८) द्वारे सिमेंटच्या गोण्या भरून चिंचोली गावाकडे गेले होते. सिमेंट उतरवून जळगावकडे परत येत असताना चिंचोलीजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेत संजय सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
    अपघातानंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    accident jalgaon midc police staision
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif