चाळीसगाव (प्रतिनिधी) :-येथील हेड पोस्ट आॉफिस मधील सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये भाग घेऊन संप 100 टक्के यशस्वी केला.केंद्र सरकारच्या कर्मचारी धोरणाच्या विरोधात देशव्यापी पुकारलेल्या संपात चाळीसगाव पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन आज संप यशस्वी केला यावेळी कामगारांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन ही केंद्र सरकार ला पाठविण्यात आले.
यामध्ये केंद्र सरकारने चालविलेल्या खासगीकरणाचा विरोध, जुनी पेन्शन स्कीम लागू करा ,ग्रामीण भागातील पोस्टमन बांधवांना कायम करा ,यासह विविध मागण्यांसाठी आजचा संप करण्यात आला होता हा संप यशस्वी करण्यासाठी चाळीसगाव पोस्ट ऑफिस मधील शिवदास बडगुजर मनोज कंरकाळ ,तुषार महाजन ,भाऊराव पाटील विजय जाधव ,सागर पाटील, सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी यशस्वी प्रयत्न केले