चाळीसगाव शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख पदी सौ. सविता कुमावत

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर साहेब संपर्कप्रमुख संजय सावंत साहेब सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ तसेच महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा ताई पाटील जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने यांच्या शिफारशीनुसार चाळीसगाव तालुका महिला आघाडीच्या संघटक पदी सौ सविता कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली.

चाळीसगाव येथील तालुका मेळ्यात तसे नियुक्त पत्र देऊन त्यांना कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे यावेळी चाळीसगाव येथील उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण शहर प्रमुख नाना कुमावत तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे संघटक सुनील गायकवाड विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाने आणि असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले या निवडीतून तालुक्यातील महिला आघाडी भक्कम पणे उभी करावी असा आदेश त्यांना पक्षनेत्यांन मार्फत देण्यात आलेला आहे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पक्ष कार्यास जोमाने सुरुवात करण्यास सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here