बॅनर फाटण्याच्या प्रकारातून होवू शकते अशांतता निर्माण,पालीकेने लक्ष देण्याची गरज,
चाळीसगाव :-चाळीसगाव शहरात बॅनरची गर्दी झाली आहे या बॅनर मुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे पालिकेने बॅनर लावण्याबाबत परवानगी घेऊन जितके दिवस बॅनर लावण्याचे भाडे दिले आहे इतके दिवस बॅनर लावण्याची तप्तरता पालिकेने दाखवली पाहिजे, वाढत्या बॅनरबाजी मुळे बॅनर फाडण्याचे व फाटल्या चे प्रकार वाढले आहेत ,त्यामुळे शहरात अ शांततेचे वातावरण निर्माण होऊन अराजक्ता माजण्याची ची भीती निर्माण होत आहे. नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी याबाबत वेळीच सजगता दाखवून उपाययोजना केली नाही तर शहरात *फाटले पोस्टर आणि झाली दंगल * अशी स्थिती उद्भवल्या शिवाय राहणार नाही .गेल्या तीन चार वर्षापासून चाळीसगाव शहराला बॅनर बाजी ने विखळे घातला आहे बॅनर लावण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिले आहेत . मात्र या निर्देशाचे पालन होताना दिसत नाही. शहरातील शाळा, कॉलेज ,मोक्याच्या रहदारीच्या जागा, चौकांमध्ये भले भले मोठे बोर्ड बॅनर लावण्यात येत असून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. मात्र न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असून देखील त्याप्रमाणे कारवाई करण्याची किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार नगर पालिका तयारी दाखवत नाही.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने काही ही इच्छुक भावी आमदारांच्या अंगात आतापासून आमदारकी शिरूर लागल्याने जणू आपण आमदार झालो या थाटात मनमानी पद्धतीने शहरात मोठी बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण चालू आहे .या तथाकथित भावी आमदार व त्यांचे चेले मोठ मोठाली बॅनर लावून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम जरी करीत असले. परंतु या पोस्टरबाजीच्या गर्दी मुळे बॅनर फाडण्याचे व फाटण्याची प्रकार घडत आहे .अलीकडेच असे प्रकार चाळीसगावात घडले आहे याबाबत फाटलेल्या पोस्टर बाबतची सोशल मीडियावर उलट सुलट वार चालू आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत या दिवसात वादळ वाढण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पोस्टर फाटण्याचा प्रकार होऊ शकतो मात्र यातून वेगळा अर्थ काढून ध चा मा होऊन शहरातील वातावरण गढूळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तत्पूर्वी चाळीसगाव नगरपालिकेने पोस्टर बाबतची आणि बॅनर बाबतची आपली गुळगुळीत भूमिका न घेता शहराच्या दृष्टिकोनातून भविष्यात यात उपाययोजना करण्याची ची गरज आहे. नाहीतर अशी म्हणण्याची वेळ येईल फाटलं पोस्टर झाली दंगल
तरी भविष्यात असले प्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी व माननीय न्यायालयाचा आदर करावा अशी अशी अपेक्षा चाळीसगाव कर नागरिक करीत आहेत .