चाळीसगाव शहरातील शाळांजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी

0

चाळीसगाव :- चाळीसगाव शहरातील मध्यवर्ती भागातून जाणारा धुळे सोलापूर नॅशनल हायवे क्र.५२ हा रस्ता , नगरपालिकेने आपल्या अखत्यारीत न ठेवता नॅशनल हायवे कडे ठेवल्याने ,ह्यच रस्त्यावर हॉटेल विराम पासून शहरात अवजड वाहने येवू नये म्हणून बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे.

परंतु या बायपास रस्ता चा वापर वाहनचालक करीत नाही, आणि आपली अवजड वाहने भरधाव वेगाने शहरातून नेत असतात ,या वाहनांमुळे अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहेत. शहरातील जवळपास अॅग्लो उर्दु हायस्कूल, नगरपालिका मराठी शाळा क्रं ४ व ५ ,ए बी हायस्कूल, राष्ट्रीय कन्या शाळा, सरस्वती विद्या मंदिर, अशा सर्व शाळा मुख्य रस्त्यावर आहेत आणि या शाळेत जाणारी लहान मुले ह्याच रस्त्यावर ये जा करीत असतात.आणि हृयाच रोड वर अवजड वाहनांची वर्दळ भरधाव वेगाने जोरात असल्याने केव्हा काय ? अनर्थ होईल सांगता येत नाही.म्हणून या शाळेच्या ठिकाणांजवळ संबंधित विभागांकडून त्वरीत गतीरोधक बसविण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.