चाळीसगाव:-(प्रतिनिधी) येथील विमानतळ व जुना मालेगाव रोड विभागातील नागरीकांनी आज रोजी पिण्याच्या पाण्याची समस्या साठी नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती व उपमुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कारण की रेल्वे पलिकडील काही भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसून तसेच चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात यावा व नागरीकांच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील, आरोग्य सभापती रोशन जाधव ,तसेच वाघ साहेब, संजय अहिरे, माजी नगरसेवक संजय ठाकरे, कोमल सिंग राजपूत, अरुण पाटील, जयसिंग पाटील ,रवींद्र चकले, आनंद शिंदे, दात्रे थोरात, सुनील पाटील व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.