चाळीसगाव वासियांसाठी दिलासादायक बातमी, ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यात करोना संसर्ग आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता चाळीसगाव तालुक्याचे आमदार श्री मंगेश चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन, चाळीसगाव शहरातील अद्यावत असे ट्रामा केअर सेंटर आहे. परंतु सुविधांचा अभाव असल्याने त्या ट्रामा केअर सेंटर मध्ये DPDC योजनेतून १३५ जम्बो सिलेंडर क्षमतेचा १ कोटी ३७ लाखांचा ऑक्सिजन प्लांटची उभारण्यात येणार, येत्या २ दिवसात प्रशासकीय मान्यता.

जिल्हा प्रशासनाकडे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या मागणीनुसार कोविड केअर सेंटरला ४ मेडिकल ऑफिसर, ४ स्टाफ नर्स, १० वार्डबॉय, २ डेटा एन्ट्री ऑपरेटर, १ एक्सरे टेक्निशियन अशी २१ नवीन तात्पुरती पद तात्काळ भरली जाणार आहे. ५ व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन ऑक्सिजन बेड्सची संख्या ३८ वरून ७० इतकी वाढविण्यात येणार आहे.

आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन रक्त तपासणी मशीन, ऑक्सिजन Concentrator, Cell Counter, Bypape मशीन, एअर कंडिशनर, ICU बेडस, दोन बेडस मध्ये कर्टन्स, स्वछतेसाठी टाईल्स क्लिनर आदी नवीन मशिनरी उपलब्ध होणार आहे

येत्या ८ दिवसात जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शन चाळीसगाव तालुक्याला उपलब्ध होणार तसेच गरज वाटल्यास अजून ५० बेडस क्षमता तातडीने वाढविण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध करण्यात येईल, या सर्व सुविधा उपलब्ध होवून

चाळीसगावकरांच्या कोरोनाविरोधातील लढाईला  मिळणार बळ मिळणार असल्याचे आमदार श्री मंगेश चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले,

Leave A Reply

Your email address will not be published.