चाळीसगाव येथे वाईन शॉपवर अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची दारूसह रोकड केली लंपास

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रिश वाईन शॉपवर काल रात्री अंदाजे १ वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ५० लाखाच्या आसपास दारूचे व बियरचे खोके सह दिवस भरातील दारू विक्रीची रोकड लंपास केल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

या घटनेमुळे दुकान मालक दिनेश राजकुमार नोतवाणी व कामगार विजय पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देताच चाळीसगाव विभागाचे पोलीस अधिकारी श्री कैलाश गावडे यांचेसह शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजय कुमार ठाकुरवाड अॆपीआय नासिर सय्यद घटनास्थळी दाखल झाले.प्रथमदर्शनी चोरी चा अंदाज घेता पोलिसांनी डॉग पथक पाचारण करण्यात आले.

सदरहू घटनेबाबत पंचनामा करण्याचे काम सुरू होते चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिसनिरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड सहायक पोलिसनिरीक्षक पोलीस पथक तपास करत आहेत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Leave A Reply

Your email address will not be published.