चाळीसगाव | प्रतिनिधी
सुरत येथे विद्यार्थ्यांच्या क्लासला आग लागुन २० विद्यीर्थी व शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
त्या पार्श्वभुमीवर चाळीसगाव येथील क्लासेस चालकांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात म्हणजे तशी घटना घडणार नाही अशा आशयाचे निवेदन रयत सेना, खुशालभाउ मित्र मंडळ, जागो ग्राहक जागो या संघटनांच्या वतीने तहसिलदार अमोल मोरे यांना दि २८ रोजी देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सुरत येथे विद्यार्थी च्या क्लास ला आग लागून जवळपास 20 मुले व शिक्षक चा दुर्दैवी मुत्यू झाला चाळीसगाव शहरा मध्ये देखील मोठ्या प्रमाणात खाजगी क्लास सुरु आहे त्या ठिकाणी चाळीसगाव शहर व तालुक्यातूंन विद्यार्थी येत असतात मात्र त्याच्या सुरक्षा सदर्भात ह्या क्लासेस मध्ये कुठली हि उपाययोजना नसून हजारो विध्यर्थी क्लास ला जातअसल्या मुळे संबंधीत सर्व क्लास चालकांनी क्लास घेत असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षा बाबत खबरदारी म्हणुन हमी पत्र लिहून घेऊन त्याच्या पालकांना हमी दयावी भविष्यत असा अनुचित प्रकार घडल्यास क्लास चालक जबाबदार राहणार असल्याचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना दि २८ रोजी देण्यात आले निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जागो ग्राहक जागो चे खुशाल पाटील ,रयत सेना तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,सागर पाटील.राहुल पाटील, भाऊसाहेब पाटील,खुशाल बीडे , खुशाल भाऊ मित्र मंडळ , रयत सेना, जागो ग्राहक जागो यांच्या सह सामाजिक संघटनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.