Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चाळीसगाव येथे अडकलेले २२ मजूर बसने स्वगृही रवाना
    ताज्या बातम्या

    चाळीसगाव येथे अडकलेले २२ मजूर बसने स्वगृही रवाना

    By May 11, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    येत्या २ दिवसात २०० परप्रांतीय मजुरांना घरी पाठविण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातर्फे नियोजन
     चाळीसगाव – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत मोफत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आज चाळीसगाव तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील २२ मजुरांना घेऊन राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस चाळीसगाव आगारातून रवाना झाली. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, आगार प्रमुख संदीप निकम व उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रवाश्याच्या शुभेच्छा दिल्या. सदर बस मधील प्रवाश्यांना जेवणाची पाकिटे देखील सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्यातर्फे वाटप करण्यात आले. या मजुरांना रावेर तालुक्यातील मध्यप्रदेश हद्दीवरील चोरवड येथे सोडले जाणार असून तेथून मध्यप्रदेश आगाराच्या बसने ते स्वगृही पोहोच करण्यात येईल. चाळीसगाव आगाराच्या बस क्रमांक MH20 BL 3410 ने या मजुरांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी चालक सुनील ठाकरे हे सेवा देत आहेत.बस सूरु झाल्या नंतर बसमधिल मजूरांनचा अश्रू अनावर झाले , बस मार्गस्थ झाल्या वरही बसमधिल मंजूर  खिडकीतून डोकावून त्यांच्या भावना हात बाहेर काढून व्यक्त होतेकरीत
    आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात चाळीसगाव तालुक्यात अडकलेल्या व चाळीसगाव तालुक्यातील इतर जिल्ह्यात व राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले होते त्यात परप्रांतीय २४२ मजुरांची नोंदणी करण्यात आली होती. या मजुरांना देखील शासकीय अट – शर्तींच्या अधीन राहून टप्प्याटप्प्याने बसच्या माध्यमातून रवाना केले जाणार असल्याची माहिती शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif