Sunday, May 29, 2022

चाळीसगाव येथील महिला बचत गटाची फसवणुक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

चाळीसगाव, प्रतिनिधी  

- Advertisement -

चाळीसगाव येथील जय मातादी महिला स्वयं सहाय्यता बचत गट अध्यक्षा व माता माधवी महिला स्वयं सहाय्यता बचत गटाची सदस्यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून धुळे येथील पुरवठादार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व कर्मचार्‍यांनी परस्पर अनुदान लाटल्याचा प्रकार नुकताच उघडकीस  आल्यामुळे   यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गटाच्या अध्यक्षा लता सुभाष अग्रवाल यांनी केली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, दोन्ही बचत गटांवर एकात्मिक बालविकास प्रकल्प (नागरी) भुसावळ अंतर्गत असलेल्या चाळीसगाव येथील अंगणवाड्यांना गरम व ताजा आहार पुरविण्याचे काम मागील बर्‍याच वर्षांपासून  संबंधीत कार्यालयामार्फत सुरू होते. मात्र, धुळे येथील बोगस पुरवठादार संबंधित कार्यालयाचे  अधिकारी व कर्मचारी यांनी वरील दोन्ही बचत गटांचा चाळीसगाव येथील बचत गटाच्या खर्‍या अध्यक्षा सचिव व सदस्यांच्या खोट्या सह्या करून आणि त्या बचत गटांमध्ये धुळे येथील सधन कुटुंबातील  पुरुषांच्या मदतीने त्याच सधन कुटुंबातील महिलांची नावे समाविष्ट करून घेतली आहेत.

नियमाप्रमाणे चाळीसगाव येथील शहरी अंगणवाडीचे पुरवठ्याचे काम स्थानिक बचत गटाला देण्यात यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. याउलट सदर  बचत गटात धुळे येथील महिलांचा समावेश करण्यात आला. वास्तविक या गटात चाळीसगाव येथील स्थानिक महिलांचा समावेश असणे गरजेचे होते. चाळीसगावच्या वरील दोन्ही बचत गटात धुळ्याच्या महिलांचा समावेश कसा  केला गेला ? याची शहानिशा होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे बरेच काम धुळे येथील बोगस पुरवठा दाराने संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन संगनमत करून फसवणुक केल्याचा आरोप दिलेल्या प्रसिद्धीपत्रात नमुद आहे.

बचत गटाच्या खर्‍या सभासदांना अंधारात ठेवून बचतगटाच्या सभासदांची आणि शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. सदरील प्रकरणाची सखोल चौकशी होऊन धुळे येथील बोगस पुरवठादार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व कर्मचारी (नागरी) भुसावळ, जि.जळगांव यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अध्यक्षा लता अग्रवाल यांनी केली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या