चाळीसगाव महाविद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प पथदर्शी प्रयोग : खा.उन्मेषदादा पाटील

0

चाळीसगाव – येथील बी पी आर्टस् एस एम ए सायन्स के के सी कॉमर्स कॉलेज आणी के.आर. कोतकर ज्यूनीयर कॉलेज मध्ये १० केव्हीए क्षमतेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचा उदघाटन समारंभ नुकताच जळगाव लोकसभा मतदार संघाचे नवं निर्वाचित खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या शुभहस्ते झाले . समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे मॕँनेजींग बोर्डाचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल होते. उमंग समाज शिल्पी परीवाराच्या  अध्यक्षा सौ संपदाताई उन्मेष पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख,  डॉ एम बी पाटील,  श्यामलाल कुमावत, क मा राजपूत, मु रा  अमृतकार,  डॉ सुनील राजपूत चाळीसगाव भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे,  ज मो अग्रवाल,  योगेश अग्रवाल,  अशोक बाबुलाल वाणी  ई व्यासपीठावर उपस्थित होते या वेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक  प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर यांनी केले

चाळीसगाव महाविद्यालयाने अपारंपरिक ऊर्जा श्रोताचा वापर करण्यासाठी  सौर प्रकल्पची उभारणी केली  ही बाब खरोखर  समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आहे   अपारंपरिक ऊर्जा श्रोतांच्या माध्यमातून घरोघरी उर्जा निर्मीती केली जाऊ शकते व त्यातून  अनेक तरूणाःना रोजगार उपलब्ध  होऊ शकतात  व   ग्रामीण भागातील विद्यार्थां  नोकरी च्या मागे न जाता   रोजगार निर्माती करू  शकतो. तसेच  महाविद्यालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर देऊन तरुणांना रोजगारभिमुक करावे. तालूक्यातील इतर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा प्रकल्प आवर्जून दाखवावा आणि त्यांना या संदर्भात समजून सांगावा जेणेकरून ग्रामीण भागात सौर ऊर्जेचे महत्व समजेल.   महाविद्यालयास डॉ.मिलींद बिल्दीकर यांच्या रूपाने संगणक , माहीती व तंत्रज्ञाना क्षेत्राशी नीगडीत व आभ्यासू  प्राचार्य मिळाले त्यामूळे नारायणभाऊंच्या नेत्रूत्वाखाली महाविद्यालयाची व पर्यायाने संस्थेची प्रगती होईल आसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन खासदार उन्मेषदादा पाटील यांनी या प्रसंगी दिले. याप्रसंगी उन्मेषदादा पाटील हे जळगाव लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा चाळीसगाव एजुकेशन संस्थेचे  मॅनिंजिंग बोर्ड चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल यांनी सपत्नीक हृद्य असा सत्कार केला

यावेळी सौ संपदा पाटील के बी साळुंखे संचालक योगेश अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात नारायणभाऊ म्हणाले कि गेल्या काही वर्षांमध्ये, विजेचे दर कमालीचे वाढले आहेत सौरऊर्जा निर्माण केल्यास आपल्या विजेच्या बिलात बचत होईल, आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी खासदार झाल्याचा खूप आनंद झाला, उन्मेशदादा खूप आभ्यासू असून ते नक्कीच जिल्ह्याचा विकास करती असे सांगून त्यांना भावी वाटचालीसाठी भाऊंनी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा रवींद्र पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य अजय काटे यांनी मानले

Leave A Reply

Your email address will not be published.